मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

हडपसरमध्ये मसाज सेंटरवर छापा, महिला चालक अटकेत

वेश्याव्यवसायातून ५ महिलांची सुटका

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

हडपसरमध्ये मसाज सेंटरवर छापा, महिला चालक अटकेत

वेश्याव्यवसायातून ५ महिलांची सुटका

पुणे: हडपसर परिसरातील मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने धाड टाकून पाच महिलांची सुटका केली. या कारवाईत मसाज सेंटरची मॅनेजर तथा मालकीण आशा मुकेश गोरे (वय ५५, रा. हांडेवाडी, हडपसर) हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ मे २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, हडपसर गाडीतळ परिसरातील वैभव थिएटर शेजारी असलेल्या भोसले आर्केड इमारतीतील “एस.पी. बॉडी फिटनेस” या मसाज सेंटरमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने पडताळणी केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खात्री करून पोलिसांनी मसाज सेंटरवर अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान मसाज सेंटरमध्ये आणलेल्या पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आशा मुकेश गोरे हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ (१)(३) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-४) विजय कुंभार, पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण तसेच पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, जाधव, केदार, रसाळ, कोंडे आणि महिला पोलीस अंमलदार खेडेकर यांनी सहभाग घेतला.

शेअर करा