मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्यास नकार

Mumbai News मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्यास नकार मोदींविरोधातील वक्तव्याप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्यास नकार मोदींविरोधातील वक्तव्याप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai News : मोदींविरोधातील वक्तव्याप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Mumbai News मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले समन्स रद्द करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी राहुल गांधींचा युक्तिवाद फेटाळून लावत भाजप ही नोंदणीकृत राष्ट्रीय राजकीय पक्ष असल्याने एक ओळखण्यायोग्य संस्था असल्याचे नमूद केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News

भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधींविरोधात गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये राजस्थानमधील एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘चोरांचे स्वामी’ आणि ‘कमांडर इन चीफ’ असे कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये राहुल गांधींना हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. जुलै २०२१ मध्ये हे समन्स प्राप्त झाल्यानंतर राहुल गांधी यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले. भाजप कार्यकर्त्याने दाखल केलेली तक्रार कायदेशीरदृष्ट्या टिकणारी नसल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या वक्तव्यात पक्षाचे नाव घेतले नसल्याने कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा वर्गाला लक्ष्य केलेले नाही, असा युक्तिवाद राहुल गांधींकडून करण्यात आला.https://maharashtramirror.com/ Mumbai News

मात्र, सरकारी पक्षाने राहुल गांधींचा युक्तिवाद फेटाळून लावला. प्रथमदर्शनी गुन्हा दाखल होण्यास पुरेसा आधार असल्याने उच्च न्यायालयाने या टप्प्यावर हस्तक्षेप करू नये, असे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयात सांगितले. तसेच सीआरपीसीच्या कलम १९९ आणि आयपीसीच्या कलम ४९९ अंतर्गत तक्रारदाराला कायदेशीर अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला.

न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी राहुल गांधींचा युक्तिवाद मान्य केला नाही. भाजप हा नोंदणीकृत राष्ट्रीय राजकीय पक्ष असून तो निश्चितपणे ओळखण्यायोग्य संस्था आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तक्रारदार गेल्या दोन दशकांपासून भाजपचा सक्रिय सदस्य असल्याचा दावा करतो. त्यामुळे पंतप्रधान आणि भाजप यांच्यातील संबंधांचा उल्लेख असलेल्या वक्तव्याचा परिणाम केवळ पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापुरता मर्यादित आहे, असे या टप्प्यावर म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

शेअर करा