मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर

Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर

Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण, राहुल गांधी यांचा कोल्हापुरात मुक्काम

मुंबई :- काँग्रेसचे वरिष्ठ नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या म्हणजेच 4 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर Rahul Gandhi Kolhapur Visit येणार आहेत. कोल्हापुरातील कसबा- बावडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. 4 तारखेला राहुल गांधी यांचा कोल्हापुरातच मुक्कामी असणार आहेत. तर राहुल गांधी 5 तारखेला विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहे. राहुल गांधी दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाविकास आघाडीचे अनेक नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ शकतात तसेच जागा वाटप संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Latest News

राहुल गांधी यांचा दौरा कसा राहणार?

राहुल गांधी उद्या (4 ऑक्टोबर) शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर येत आहेत. विमानतळावरु कसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

दुसऱ्या म्हणजेच (5 ऑक्टोबर) दिवशी दुपारी 1.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. यानंतर हॉटेल सयाजीमध्ये होणाऱ्या संविधान संवाद सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील.

दरम्यान, हॉटेल सयाजीमध्ये होत असलेल्या संविधान संमेलनासाठी विविधसामाजिक संघटनेची निमंत्रित बाराशे प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. 14 वर्षांनी राहुल गांधी कोल्हापुरात येत असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसव नियोजन करत आहे. Maharashtra Latest News

  • राहुल गांधी यांचे 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल
  • 6.30 वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा लोकार्पण होईल
  • 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी अभिवादन होणार आहेत
  • दुपारी 2.30 वाजता हॉटेल सयाजीमध्ये संविधान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती राहतील.
  • सायंकाळी 4.00 वाजता हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळाकडे ते प्रयाण करतील.
  • हेही वाचा: 'शेतकऱ्याच्या मुलाला कमी सुंदर मुलीशी विवाह करावा लागतो', आमदाराच्या विधानावरुन वाद

    शेअर करा