Pune News : मला तुमच्या राजकारणाचा भाग करू नका!" - राहुल गांधींच्या भेटीच्या निरोपाला विद्यार्थिनीचा थेट नकार
Pune News : पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठवलेल्या भेटीच्या निरोपावर एका विद्यार्थिनीने जाहीरपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठवलेल्या भेटीच्या निरोपावर एका विद्यार्थिनीने जाहीरपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मला कोणत्याही राजकीय लाभासाठी किंवा राजकारणासाठी वापरू नका," असे स्पष्ट करत तिने या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. कॅम्पसवरील राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन तिने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
COEP हॉस्टेलमधील वादग्रस्त प्रकरणानंतर संबंधित मुलीचा काही तासांपूर्वी व्हिडिओ समोर आला होती. न्यूज चॅनेलला दिलेल्या बाईटमध्ये तिने “काँग्रेसवाल्यांनी मला मॅनिप्युलेट केले होते” असा दावा केला आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थिनीला भेटण्याचा निरोप दिला होता मात्र, विद्यार्थीने साफ नकार दिला आहे. https://maharashtramirror.com/ Pune News




