मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : ‘रेस ४’मध्ये सलमान-सैफचा पत्ता कट?

Mumbai News: मुंबई : बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘रेस’ चित्रपटाच्या चौथ्या भागाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘रेस ४’मध्ये सलमान-सैफचा पत्ता कट? आमिर खानच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा
‘रेस ४’मध्ये सलमान-सैफचा पत्ता कट? आमिर खानच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा

Mumbai News : आमिर खानच्या एन्ट्रीची जोरदार चर्चा

Mumbai News: मुंबई : बॉलिवूडमधील बहुचर्चित ‘रेस’ चित्रपटाच्या चौथ्या भागाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ‘रेस ४’मध्ये अभिनेता सैफ अली खान आणि सलमान खान यांची भूमिका असणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या चित्रपटात आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानची वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. आमिर खानला ‘रेस ४’साठी विचारणा करण्यात आल्याचे बोलले जात असून, त्याच्या सहभागाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
‘रेस’ फ्रँचायझीला सुरुवातीपासूनच दमदार कलाकार, अॅक्शन आणि ट्विस्ट्ससाठी ओळखले जाते. त्यामुळे आमिर खानसारख्या अभिनेत्याची या चित्रपटात एन्ट्री झाल्यास प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढण्याची शक्यता आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News,
सैफ अली खानने ‘रेस’च्या पहिल्या दोन भागांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती, तर ‘रेस ३’मध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. आता चौथ्या भागासाठी नव्या कलाकारांची निवड होत असल्याने चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट नेमकी कशी असेल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
मात्र, आमिर खानच्या ‘रेस ४’मधील सहभागाबाबत निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात याबाबतची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.

शेअर करा