मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दुष्काळी मदतीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता; केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

Pune News :पुणे, ः अपुरा पाऊस आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दुष्काळी मदतीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता; केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
दुष्काळी मदतीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता; केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

Pune News :अल्प पाऊस आणि दीर्घ पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात; केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर मदतीबाबत निर्णय अपेक्षित

Pune News :पुणे, ः अपुरा पाऊस आणि दीर्घकाळ पडलेल्या पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्यात येणाऱ्या मदतीच्या दरांत वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा असून, केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) निकषांनुसार मदतीच्या रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याचा लाभ जिरायती, बागायती तसेच बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळू शकतो.https://maharashtramirror.com/ pune News

यंदा अल निनोच्या प्रभावासह प्रतिकूल पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. हाती येण्याच्या टप्प्यात असलेली पिके वाया गेली असून, नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीनच्या आतापर्यंत झालेल्या कापणी प्रयोगांमध्ये एकरी सरासरी दोन क्विंटल, तर हेक्टरी सुमारे पाच क्विंटल उत्पादनाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, पावसाअभावी तूर पीक करपू लागले असून, कापूस उत्पादनावरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

वाढीव मदतीसाठी शेतकऱ्यांचा दबाव
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या निधीमध्ये केंद्र सरकारचा ७५ टक्के, तर राज्य सरकारचा २५ टक्के वाटा असतो. मदत देण्यासाठी केंद्र सरकारने निकष निश्चित केले आहेत.

मात्र, यंदाची दुष्काळी परिस्थिती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेता, सध्याच्या मदतीच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानही शेतकऱ्यांनी नुकसानीची परिस्थिती मांडत भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आता केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून कोणत्या मार्गदर्शक सूचना जारी होतात आणि मदतीच्या दरांत वाढ होते का, याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाढीव मदतीचा निर्णय झाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा