मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत! शिंदे सेनेकडून अपक्ष उमेदवार सचिन सानपांना जाहीर पाठिंबा

Pune News : पुणे :- पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीमधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत! शिंदे सेनेकडून अपक्ष उमेदवार सचिन सानपांना जाहीर पाठिंबा •भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले; कोण आहेत सचिन सानप? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत! शिंदे सेनेकडून अपक्ष उमेदवार सचिन सानपांना जाहीर पाठिंबा •भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले; कोण आहेत सचिन सानप? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Pune News : भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले; कोण आहेत सचिन सानप? राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

Pune News : पुणे :- पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महायुतीमधील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाने कौस्तुभ गावडे यांना रिंगणात उतरवले असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे महायुतीमध्येच 'फ्रेंडली फाईट' (मैत्रीपूर्ण लढत) पाहायला मिळणार असून, या निर्णयामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.Pune News https://maharashtramirror.com/

कोण आहेत सचिन सानप? उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या ओएसडी पदापासून निवडणुकीच्या रिंगणापर्यंतचा प्रवास

पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले प्राध्यापक सचिन सानप हे मूळचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी (Officer on Special Duty) म्हणून कार्यरत होते. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. शिक्षकांचे प्रश्न, प्राध्यापक व शिक्षकांच्या अडीअडचणी आणि शैक्षणिक क्षेत्रातील खालावलेली गुणवत्ता याविरोधात सातत्याने आवाज उठवणारे तरुण चेहरे म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शैक्षणिक संस्थांच्या संचालकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या प्रचाराचा धडाका लावला असून, आता थेट शिंदेसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांच्या राजकीय ताकदीत मोठी भर पडली आहे.

महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; निवडणुकीच्या राजकारणात नवे रंग

पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागांच्या वाटपावरून महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच मतभेद असल्याचे समोर आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अखेर शिंदेसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या पारड्यात आपले वजन टाकल्याचे बोलले जात आहे. महायुतीमधील घटक पक्ष आमनेसामने आल्यामुळे या निवडणुकीत आता चुरस वाढली असून, शिक्षक मतदार नेमकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा