मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune POCSO Cases | पुण्यात लिंगपिसाट झाले म्हातारे ! लहान मुलींवर अत्याचार : पॉस्को गुन्हे दाखल

सावधान !

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune POCSO cases

  • सावधान ! लहान मुलींवर लक्ष ठेवतात लिंगपिसाट
  • पुणे, दि. १४ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी

    Pune POCSO Cases | माणसांची नैतिकता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यातच घराला, समाजाला नैतिकता शिकवणाऱ्या जेष्ठांकडूनच अपराध होत असेल तर धक्काच लागतो. असाच प्रकार पुण्यातील धनकवडी भागात घडला आहे. लिंगपिसाट झालेल्या दोन जेष्ठ नागरिकांकडून दोन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. याबाबत सहकार नगर पोलीस ठाण्यात (Sahkarnagar Police Station) पॉस्को (Protection of Children from Sexual Offences Act, 2012.) कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Pune POCSO Cases

    खाऊ देण्याचे आमिष, गळ्याला चाकू लावून अत्याचार

    पहिल्या घटनेत, दि. ६ रोजी एका सात वर्षीय मुलीला लिंगपिसाट जेष्ठ नागरिकाने खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी नेले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करताच तिच्या गळ्याला चाकू लावून पोलिसांना व घरच्यांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. Pune POCSO Cases

    पीडित मुलीच्या आजीने फिर्याद दिल्यावरून संशयित मधुकर पिराजी थिटे, वय -७८ (धनकवडी) यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Pune news

    चॉकलेट देण्याचे आमिष आणि अत्याचार

    तर दुसऱ्या घटनेत, दि. ११ रोजी दुकानासमोर खेळत असणाऱ्या अल्पवयीन मुलीला लिंगपिसाट म्हाताऱ्याकडून चॉकलेटसाठी पैसे देण्याचा बहाणा करून लगट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर चल म्हणून विनयभंग करण्यात आला. याबाबत तक्रार दाखल झाल्यावरून संशयित महावीर श्रीमलजी सिंगवी, वय -७०, (धनकवडी) याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला. Pune crime news

    हेही वाचा: Maharashtra News : शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांनी केला करोडोंचा जमीन घोटाळा, विरोधी पक्षनेत्यांनी केला गंभीर आरोप

    शेअर करा