मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिका सज्ज

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना आणि गणेशभक्तांना सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिका सज्ज
खड्डेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणे महानगरपालिका सज्ज

Pune News : रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याचे आदेश

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना आणि गणेशभक्तांना सुरक्षित व सुकर वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली असून, रस्ते दुरुस्ती आणि देखभालीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे सक्त आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.महापालिकेची सर्व प्रशासकीय परिमंडळे आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील रस्त्यांच्या सध्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.गणेशोत्सवाच्या कालावधीत लाखो नागरिक, भाविक आणि गणेशभक्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणतीही रहदारीची अडचण निर्माण होऊ नये आणि प्रमुख रस्ते चांगल्या स्थितीत राहावेत, यासाठी पथ विभागाला विविध कामांना तातडीने गती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. https://maharashtramirror.com/ Pune News

रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे मार्गी लागणार?

रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवून समतल करणे, खराब झालेले चेंबर आणि मॅनहोलची दुरुस्ती करणे. नागरिकांच्या चालण्यासाठी पादचारी मार्ग (फुटपाथ) दुरुस्त करणे, विविध वाहिन्यांच्या (युटिलिटी) कामांनंतर उकरण्यात आलेले रस्ते पूर्ववत करणे (रिइन्स्टेटमेंट) आणि इतर आवश्यक ती सर्व डागडुजी व सुशोभिकरणाची कामे मार्गी लावण्याचे आदेश या वेळी देण्यात आले आहेत. शहरातील १२ मीटर आणि १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणादरम्यान आढळणारे खड्डे आणि रस्त्यांशी संबंधित इतर त्रुटी तात्काळ दूर करून योग्य ती कायदेशीर व तांत्रिक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवात नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही सर्व कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही बजावण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सर्व प्रशासकीय क्षेत्रांचे उपआयुक्त आणि क्षेत्रीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच, गणेशोत्सव पूर्णपणे खड्डेमुक्त वातावरणात पार पडेल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक व निवारक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या महत्त्वाच्या आढावा बैठकीस महापालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त विजयकुमार थोरात, अरविंद माळी, आशा राऊत यांच्यासह विविध क्षेत्रीय कार्यालयांचे साहाय्यक आयुक्त आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेच्या या धडक भूमिकेमुळे यंदाचा गणेशोत्सव नागरिकांसाठी अधिक सुखकर आणि सुरक्षित ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

शेअर करा