मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुण्यातील टोळीयुद्धाचा थरार! 'आंदेकर टोळी'ने घेतला बदला, मुलावर गोळ्या झाडून हत्या

•18 वर्षीय आयुष कोमकरच्या शरीरात नऊ गोळ्या, टोळीयुद्ध पुन्हा ऐरणीवर; आई-वडिलांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी नागपूर कारागृहातून पुण्यात आणणार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Crime News: "Attack in revenge for pistol information!"

•18 वर्षीय आयुष कोमकरच्या शरीरात नऊ गोळ्या, टोळीयुद्ध पुन्हा ऐरणीवर; आई-वडिलांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी नागपूर कारागृहातून पुण्यात आणणार

पुणे :- पुण्यातील टोळीयुद्धाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याच्या 18 वर्षीय मुलाची, आयुष कोमकरची भरदिवसा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत आयुषवर अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आयुषचे आई-वडील, गणेश आणि कल्याणी कोमकर, हे वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असून ते सध्या नागपूर कारागृहात बंद आहेत. त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी त्यांना खास परवानगीने पुण्यात आणले जाणार आहे. टोळीयुद्धाचा धोका लक्षात घेता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ही घटना 5 सप्टेंबर रोजी घडली. कॉलेजमधून परत आल्यानंतर आयुष कोमकर आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करत असताना मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यश पाटील आणि अमित पाटोळे अशी अटक करण्यात आलेल्या दोन मारेकऱ्यांची नावे आहेत. यश पाटीलने आयुषवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. आयुषच्या शरीरात तब्बल नऊ गोळ्या शिरल्या. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

गोळीबार करताना मारेकरी 'इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच' असे ओरडत होते. या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Pune Crime News : पुणे हादरले! माजी नगरसेवकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या मुलावर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

शेअर करा