Pune News: हडपसर-दिवेघाट मार्ग आज दुपारी दोन तास पूर्णपणे बंद
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

Pune News : आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून…
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune News : आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वारकरी आणि सर्वसामान्य वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी मार्गावरील हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्त्याला लागून असलेल्या धोकादायक दगड आणि कड्यांचे निर्मूलन करण्याचे काम आज, शनिवारी (४ जुलै) हाती घेण्यात येणार आहे. (pune news hadapsar dive ghat road closed)
या कामाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचा उपाय म्हणून दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (pune news)
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवेघाट परिसरातील रस्त्यालगतचे काही खडक आणि कडे अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने हे खडक कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी याच मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत.
Ketan Agarwal Case : सिया गोयल आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
त्यामुळे वारकऱ्यांच्या आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत या धोकादायक खडकांचे निर्मूलन तातडीने केले जात आहे. हे खडक हटवण्यासाठी मोठ्या आणि जड यंत्रसामग्रीचा (Heavy Machinery) वापर केला जाणार आहे.
https://www.instagram.com/p/DaV25xTM72K
काम सुरू असताना डोंगरावरील दगड खाली रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता दोन तासांसाठी पूर्णपणे 'नो व्हेईकल झोन' करण्यात आला आहे. (pune news)
कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही; पोलिसांचे सहकार्याचे आवाहन
दुपारी १२ ते २ या दोन तासांच्या कालावधीत हडपसर-दिवेघाट मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांसह कोणत्याही प्रकारच्या वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल किंवा अन्य मार्गांवर वळवली जाईल. (pune news)
Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.८५ लाखांचा बेकायदेशीर हुक्का फ्लेवर जप्त
"आगामी आषाढी वारी आणि पालखी सोहळा सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी हे काम अत्यंत गरजेचे आहे. या कालावधीत नागरिकांनी आणि वाहनचालकांनी हडपसर-दिवेघाट मार्गाचा वापर टाळावा. आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा," असे आवाहन वाहतूक पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: Ashadhi Wari 2026: पालखी सोहळ्यासाठी पुणे महापालिका सज्ज; यंदाची 'सेवा वारी'
तसेच पालखी सोहळ्यादरम्यान संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी, स्थानिक रहिवाशांनी आणि वाहनचालकांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




