मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ketan Agarwal Case : सिया गोयल आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Ketan Agarwal Case : पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली

M
mubarak

2 मिनिट वाचन

ketan agarwal case
ketan agarwal case

Ketan Agarwal Case : पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी कोर्टाने फेटाळली

पुणे, महाराष्ट्र मिरर

Ketan Agarwal Case : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने आज त्यांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश ए.एम. विभूते यांच्यासमोर या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांची आणखी ३ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आणि दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत (न्यायालयीन कोठडीत रवानगी) रवानगी करण्याचे आदेश दिले. (Ketan Agarwal Case siya goyal judicial custody)

तपासातील धागेदोरे आणि पोलिसांचा युक्तिवाद

गेल्या पाच दिवसांच्या कोठडीत तपास यंत्रणांनी केलेल्या तपासाचा प्रगती अहवाल आणि गोळा केलेले महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी ज्या ठिकाणी सराव (Rehearsal) केला होता त्या ठिकाणाचा पंचनामा, तसेच फाडून टाकलेल्या पासपोर्टशी संबंधित ठिकाणांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. (Ketan Agarwal Case )

हेही वाचा: Tukaram Mundhe : हॉटेलनंतर आता दूध व्यावसायिक रडारवर!


आरोपींचे कपडे जप्त करण्यात आले असून, सिया गोयल हिचा दुसरा मोबाईलही पोलिसांच्या हाती लागला आहे.
आरोपींच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्राथमिक तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी 'सांकेतिक भाषा' (Codes) आणि वेगवेगळ्या 'निकनेम'चा (टोपणनावे) वापर करून संवाद साधल्याचे समोर आले आहे. (Ketan Agarwal Case )

https://www.instagram.com/reel/DaQI2sZIPR9/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, या सांकेतिक संभाषणाचा नेमका अर्थ काय आहे, तसेच या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे बाकी आहे. शिवाय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींसमोर बसवून चौकशी करायची असल्याने आरोपींना आणखी ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी.

बचाव पक्षाचा प्रतियुक्तिवाद

दरम्यान, सिया गोयलचे वकील विपुल दूशिंग यांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध केला. त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, "सिया तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहे. पोलिसांनी ज्या मोबाईलचा उल्लेख केला आहे, तो आधीच जप्त करण्यात आला आहे. केवळ मोबाईलमधील संदेशांचा अर्थ लावण्यासाठी किंवा सांकेतिक चिन्हांची पडताळणी करण्यासाठी आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत ठेवणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही." (Ketan Agarwal Case )

Pune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.८५ लाखांचा बेकायदेशीर हुक्का फ्लेवर जप्त

दुसऱ्या बाजूने, मृत केतन अग्रवाल यांच्या बाजूच्या वकिलांनीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोलिसांकडे सध्या केवळ शक्यता आणि संशय आहे. ठोस आणि नवीन कारणांशिवाय आरोपींची पोलीस कोठडी वाढवणे योग्य ठरणार नाही.

नार्को टेस्टबाबत न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

सुनावणीदरम्यान आरोपींच्या 'नार्को अनॅलिसिस टेस्ट'चा (Narco Analysis Test) मुद्दाही उपस्थित झाला. त्यावर भाष्य करताना न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, नार्को चाचणी करण्यासाठी कायद्यानुसार आरोपींची स्वतःची संमती असणे अनिवार्य असते. त्यांच्या संमतीशिवाय अशा चाचणीला परवानगी दिली जाऊ शकत नाही. यावर सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सध्यातरी या प्रकरणात नार्को टेस्टची कोणतीही आवश्यकता भासलेली नाही. (Ketan Agarwal Case )

Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी

दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची वाढीव कोठडीची मागणी नामंजूर केली. या निकालामुळे आता दोन्ही आरोपींची रवानगी कारागृहात (न्यायालयीन कोठडी) होणार असून, पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू ठेवणार आहेत.

शेअर करा