मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
दिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धारVijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!

Pune News : महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अभिवादन

Pune News : फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार; शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अभिवादन
फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार; शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प

Pune News : पुणे : स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक आणि समतेच्या विचारांचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी महात्मा फुले यांनी समाजाला दिलेल्या शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि मानवतेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील वंचित, शोषित आणि महिलांच्या हक्कांसाठी नव्या परिवर्तनाची दिशा निर्माण झाली, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या प्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. फुले दाम्पत्याचे सामाजिक योगदान आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष लक्षात घेता त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला पुणे शहर अध्यक्षा अपर्णा मारणे साठे, सोशल मीडिया प्रमुख शैलेश खुंटे, पिंपरी-चिंचवडच्या माजी अध्यक्षा ॲड. विद्या शिंदे, पुणे शहर सरचिटणीस शारदा लडकत, उपाध्यक्ष पंकज परदेशी आणि प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.महात्मा फुले यांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper