मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे MPSC आंदोलनावरून महाविकास आघाडीत ठिणगी; सुषमा अंधारेंच्या 'युद्ध जिंकलो, तहात हरलो' विधानावर रोहित पवारांचे खडे बोल!

Pune News :पुणे :- पुण्यात गाजलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन शिवेंद्रराजेंच्या मध्यस्थीनंतर आणि विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर स्थगित करण्यात आले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे MPSC आंदोलनावरून महाविकास आघाडीत ठिणगी; सुषमा अंधारेंच्या 'युद्ध जिंकलो, तहात हरलो' विधानावर रोहित पवारांचे खडे बोल!
पुणे MPSC आंदोलनावरून महाविकास आघाडीत ठिणगी; सुषमा अंधारेंच्या 'युद्ध जिंकलो, तहात हरलो' विधानावर रोहित पवारांचे खडे बोल!

Pune News : विद्यार्थ्यांचे नुकसान करून राजकीय पोळ्या भाजायच्या का?; आंदोलनावरून सुषमा अंधारे आणि रोहित पवारांमध्ये कलगीतुरा

Pune News :पुणे :- पुण्यात गाजलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन शिवेंद्रराजेंच्या मध्यस्थीनंतर आणि विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर स्थगित करण्यात आले. या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी, "आपण युद्धात जिंकलो आणि तहात हरलो," असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अंधारेंच्या या टीकेमुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना अत्यंत सडेतोड आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नेमके प्रकरण काय होते?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार हे तब्बल 11 दिवस MPSC विद्यार्थ्यांसह एस.एम. जोशी पुलाजवळ थंडी-वारा सहन करत ठाण मांडून बसले होते आणि रात्रीही तिथेच झोपत होते. मात्र, मते आणि मुख्य मागणी असलेल्या अधिकाऱ्याच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतल्यामुळे सुषमा अंधारे यांनी यावर जाहीर टीका केली होती. या आंदोलनातून हातात काहीच पडले नाही, अशी टिप्पणी त्यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

'फक्त टीव्हीवर बोलणे सोपे असते, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू शकत नाही' — रोहित पवार

सुषमा अंधारेंच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की, केवळ व्यासपीठावर येऊन आक्रमक भाषणे देऊन निघून जाणे सोपे असते. जर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा कळवळा असता, तर तिथे जाऊन रात्रभर थांबायला आणि झोपायला पाहिजे होते.

त्या प्रसंगाची तीव्रता सांगताना ते पुढे म्हणाले की, "तिथे पोलिसांचा प्रचंड दबाव होता, 15 जणांवर आधीच कारवाई झाली होती आणि दुसऱ्या दिवशी आणखी 800 ते 1200 विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता होती. जर आम्ही जिद्दीनं तसेच बसून राहिलो असतो, तर पोलिसांच्या गाड्यांमध्ये बसून फोटो काढता आले असते आणि हिरो बनून राजकीय पोळ्या भालता आल्या असत्या. पण यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे मोठे नुकसान झाले असते, जे आम्हाला अजिबात मान्य नव्हते," असे स्पष्ट करत रोहित पवारांनी आपल्या भूमिकेचा बचाव केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा