मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे म्हाडा सोडतीत घराची लॉटरी लागली; ताबा मात्र मिळेना

Pune News : पुणे : बालेवाडीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या '४३ प्रायव्हेट ड्राईव्ह' या गृहप्रकल्पातील म्हाडाच्या सदनिकाधारकांची झालेली परवड अत्यंत वेदनादायी आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे म्हाडा सोडतीत घराची लॉटरी लागली; ताबा मात्र मिळेना
पुणे म्हाडा सोडतीत घराची लॉटरी लागली; ताबा मात्र मिळेना

Pune News : म्हाडा आणि महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://maharashtramirror.com/ Pune News

Pune News : पुणे : बालेवाडीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या '४३ प्रायव्हेट ड्राईव्ह' या गृहप्रकल्पातील म्हाडाच्या सदनिकाधारकांची झालेली परवड अत्यंत वेदनादायी आहे. सप्टेंबर २०२५ च्या म्हाडा सोडतीत घरे लागल्यानंतरही, केवळ विकासक आणि संबंधित सोसायटीच्या टोलवाटोलवीमुळे नागरिकांना आपल्याच हक्काच्या घरात प्रवेश मिळत नाही. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती असतानाही महापालिका प्रशासन आणि म्हाडाचे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

नेमकं प्रकरण काय?
बालेवाडी येथील '४३ प्रायव्हेट ड्राईव्ह' या बहुचर्चित प्रकल्पातील 'पुणे म्हाडा सोडत सप्टेंबर २०२५' अंतर्गत लॉटरीद्वारे सदनिका प्राप्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारा मुख्य प्रवेश रस्ता अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. या गंभीर प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून व निर्देश देऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिक सचिन भंडारी आणि संबंधित आर्किटेक्टवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

फ्लॅटधारकांच्या पदरी केवळ मनस्तापच
म्हाडाच्या शासनमान्य सोडतीद्वारे हक्काचे घर मिळालेल्या फ्लॅटधारकांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत विकासकाकडे देय असलेली संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली आहे. मात्र, केवळ सदनिकेकडे जाण्यासाठीचा कायदेशीर प्रवेश रस्ता रोखून धरल्यामुळे अनेक नागरिकांना घराचा ताबा मिळूनही प्रत्यक्षात ताबा घेता आलेला नाही. घर मिळूनही त्याचा वापर करता येत नसल्यामुळे तीव्र स्वरूपाची अन्यायकारक आणि मनस्तापदायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

या प्रकल्पातील इमारतीस महानगरपालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) प्राप्त झाले असल्याची माहिती आहे. असे असतानाही सदनिकेचा प्रत्यक्ष वापर आणि ताबा घेण्याच्या प्रक्रियेत प्रवेश रस्त्याचा प्रश्न निर्माण होणे अत्यंत संशयास्पद आणि गंभीर आहे. म्हाडा आणि मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. पाहणीनंतर रस्ता मोकळा करण्याचे निर्देश दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विकासक सचिन भंडारी यांनी एक गेट काढून स्वतःच्या बाजूने रस्ता मोकळा केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात संबंधित सोसायटीकडून अजूनही रस्ता वापरण्यास व वाट देण्यास मज्जाव केला जात आहे. परिणामी, मूळ समस्या 'जैसे थे' असून सदनिकेकडे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंदच आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

काय आहेत मागण्या ?
बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्ट यांनी महानगरपालिकेकडून प्रकल्पाची मंजुरी मिळवताना सादर केलेल्या अधिकृत प्लॅनमध्ये दर्शवलेला मंजूर रस्ता तात्काळ नागरिकांसाठी विनाअट खुला करण्यात यावा. नियमानुसार आणि मंजूर आराखड्यानुसार ग्राहकांना रस्ता उपलब्ध करून न देणाऱ्या संबंधित जबाबदार आर्किटेक्टचे लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावे. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होऊनही ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या व फसवणूक करणाऱ्या विकासक सचिन भंडारी याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर लेखी स्वरूपात संबंधित नागरिकांना व प्रशासनाला सादर करावा. अशा मागण्या रविराज काळे यांनी केल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

केवळ रस्त्याअभावी सर्वसामान्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि मानसिक छळ पाहता प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा