Pune News : भरधाव कचरा डंपरने घेतला दोन तरूणांचा बळी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: हडपसर येथील काळेपडळ परिसरातील महापालिकेच्या कचरा डेपोत कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्याला डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
2 मिनिट वाचन

Pune News : वेगवेगळ्या घटनांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर: हडपसर येथील काळेपडळ परिसरातील महापालिकेच्या कचरा डेपोत कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्याला डंपरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, मंगळवारी दुपारी जेएसपीएम कॉलेज हांडेवाडी रोड येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कचरा डंपरच्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे बेदकारपणे वाहन चालविणाऱ्या डंपर चालकांविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
काळेपडळ येथील महापालिका कचरा डेपोत सुनील गुरव हे सोमवारी (दि.३१) रात्री काम करत होते. त्यावेळी महापालिकेच्या कचऱ्याच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गुरव गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डंपर चालकाने तेथून पळ काढला. या घटनेमुळे पुणे महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, काळेपडळ पोलिस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिरातून हळहळ व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दरम्यान, पुणे महापालिकेने याप्रकरणी हलगर्जीपणा करणारे संबंधित चालक आणि ठेकेदाराची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर करावाई करावी. तसेच, मयत सुनील गुरव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि गुरव कुटुंबियांकडून होत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
जेएसपीएम कॉलेज, हांडेवाडी रोड आणि हडपसर परिसरातील रस्त्यांवर महापालिकेचे कचरा वाहून नेणारे डंपर आणि ट्रक अत्यंत भरधाव वेगाने, बेदरकारपणे आणि काही वेळा वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा उचलणारी हीच वाहने आता रस्त्यावरील नागरिकांसाठी ‘मृत्यूचे सापळे’ बनत आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
ठेकेदारांचा नफा महत्त्वाचा आहे का?
या घटनेनंतर शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिका कधी घेणार? रस्त्यावर धावणाऱ्या कचरा डंपरचा वेग कोण तपासतो? या वाहनांवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जाते का? चालकांचे परवाने आणि प्रशिक्षण नियमित तपासले जाते का? या वाहनांची फिटनेस प्रमाणपत्रे तपासली जातात का? कंत्राटदारांना नियम पाळण्याच्या सूचना दिल्यानंतर महापालिका त्याची अंमलबजावणी तपासते का? नागरिकांच्या जीवापेक्षा ठेकेदारांचा नफा महत्त्वाचा झाला आहे का, अशी टीकाही भानगिरे यांनी केली.
कचरा वाहतूकीच्या वाहनांचे सुरक्षा ऑडिट करावे
हडपसरसह संपूर्ण पुण्यातील कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे तातडीने सुरक्षा ऑडिट करावे, अशी मागणी होत आहे. वाहनांचा वेग, जीपीएस रेकॉर्ड, फिटनेस आणि चालकांची पात्रता तपासावी. चालकांची वैद्यकीय व मानसिक चाचणीही करावी.
तर




