मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : गणेशोत्सवातील नऊ गुन्हे उघड; २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गणेशोत्सवातील नऊ गुन्हे उघड; २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
गणेशोत्सवातील नऊ गुन्हे उघड; २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : हरियाणातील तिघांना अटक; विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन केलेले नऊ गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने पलवल येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोटारीसह सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तपासासाठी पथकाने ४ हजार ६०० किलोमीटरचा प्रवास केला.https://maharashtramirror.com/ Pune News
अजय समशेर विनोदकुमार रूपसिंग कोळी (वय २०), अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी (वय २४) आणि दिपक समशेर राजुभाई सापसिंग (वय २१) (तिघे रा. पलवल, हरियाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ३(५) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींचा माग काढण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके आणि तपास पथकाने तपास सुरू केला. आरोपी पलवल येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांना गुजरातमधील अरवली पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पथकाने तेथील पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले. तपासात त्यांचा दाखल गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
पोलीस कोठडीतील तपासात आरोपींनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान नऊ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांतील १३ लाख रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे करण्यासाठी वापरलेली १० लाख रुपये किमतीची पांढरी मारुती सुझुकी एर्टिगा मोटारही जप्त केली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके, पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी आणि तपास पथकातील अंमलदारांनी ही कारवाई केली. गेल्या दोन महिन्यांत पथकाने गुजरात, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तपास करून ६२ गुन्हे उघडकीस आणले असून, सुमारे एक कोटी २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा