मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्र

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी
पुणे जिल्ह्यातून सुका व ओला चारा वाहतुकीवर बंदी

Pune News : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व ओला चारा, तसेच कडबा, कुट्टी आणि पेंढा यांसारख्या चारा प्रकारांची वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेश जारी होईपर्यंत लागू राहणार असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा