मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल

Pune News : पुणे : श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
दहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदल ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune News : ४ व ५ सप्टेंबर रोजी विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Pune News : पुणे : श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने ४ व ५ सप्टेंबर रोजी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातील वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवरकर रोडवरही ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात येणार असून, संविधान चौक, साळुंखे विहार रोड, फ्लॉवर व्हॅली लेन आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.https://maharashtramirror.com/ Pune News

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार विविध मार्गांवर वाहतुकीचे नियमन व मार्गबदल करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, काही मार्ग पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

दहीहंडी उत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.

शेअर करा