मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

पुणे : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे व आरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २० मोबाईल फोन, किंमत अंदाजे १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Crime News : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

पुणे : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत आरोपींना पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे व आरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २० मोबाईल फोन, किंमत अंदाजे १ लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

फिर्यादी रूतुराज काटकर यांच्या मित्राचा मोबाईल (किंमत ₹१५,०००) दिनांक ३० ऑगस्ट रोजी पुणे रेल्वे स्टेशनवरून चोरला गेला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, काही इसम मंगळवार पेठेत झोपडीत राहतात व मोबाईल चोरी करून विक्री करतात.

लोहमार्ग पोलिसांच्या सर्व्हेलन्स पथकाने व आरपीएफच्या टीमने मंगळवार पेठेत छापा टाकून दोन संशयितांना पकडले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

  1. बुद्धराज मोरपाल बागडी (३२, मूळ राजस्थान)
  2. अमरलाल हंसराज बागडी (२२, मूळ राजस्थान)
  3. त्यांच्या ताब्यातून विवो कंपनीसह विविध कंपन्यांचे एकूण २० मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींनी मोबाईल चोरी करून ते जुना बाजारात कमी किंमतीत विकल्याचे कबुल केले आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    कारवाईत वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पो.उ.नि. यशवंत साळुंके, आरपीएफचे निरीक्षक यादव यांच्यासह पथकातील अंमलदार सहभागी होते.

    हेही वाचा: Vaibhav Khedekar : मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर; ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे निर्णय

    शेअर करा