मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : मोठी कारवाई! मोक्कातील 10 महिन्यांपासून फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून बेड्या

• गोपनीय माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकाने सापळा रचून आरोपी हर्ष जाधव याला केले जेरबंद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Crime News : मोठी कारवाई! मोक्कातील 10 महिन्यांपासून फरार आरोपीला कोंढवा पोलिसांकडून बेड्या

•गोपनीय माहितीच्या आधारे कोंढवा तपास पथकाने सापळा रचून आरोपी हर्ष जाधव याला केले जेरबंद

पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या कोंढवा तपास पथकाने गेल्या दहा महिन्यांपासून मोका कायद्यांतर्गत फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपी हर्ष संतोष जाधव याला कोंढवा पोलिसांनी श्रीराम चौक परिसरातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.

कोंढवा तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास मरगळे आणि पुष्पेंद्र चव्हाण यांना सोमवारी, 4 ऑगस्ट रोजी त्यांच्या गोपनीय बातमीदारांकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. कोंढवा पोलीस ठाण्यामधील मोक्का कायद्याअंतर्गत पाहिजे असलेला आरोपी हर्ष जाधव हा श्रीराम चौक, कात्रज-कोंढवा रोड येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.

या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांना कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या आदेशानुसार, राकेश जाधव यांनी एक विशेष पथक तयार केले. यामध्ये पोलीस अंमलदार विकास मरगळे, पुष्पेंद्र चव्हाण, सुहास मोरे आणि लक्ष्मण होळकर यांचा समावेश होता. या पथकाने श्रीराम चौकात सापळा रचला.

आरोपी हर्ष जाधव (वय 19) हा त्या ठिकाणी येताच, पोलिसांनी त्याला कोणत्याही प्रतिकार करण्याची संधी न देता ताब्यात घेतले. त्याला दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

शेअर करा