मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : लोणी काळभोर : माजी सरपंचाकडून शेतजमिनीच्या वादातून बाउन्सरद्वारे मारहाण

पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune crime news lonikalbhor ex sarpanch bouncer

  • पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर गुन्हा
  • पुणे, महाराष्ट्र मिरर : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून बेकायदेशीर ताबा मिळवत पिकांचे नुकसान करणे, तसेच विरोध करणाऱ्यांना बाउन्सरच्या मदतीने मारहाण करत, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कवडीगाव येथे घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सुमारे पंधरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. Pune Crime News

    चित्तरंजन गायकवाड, ओम गायकवाड यांच्यासह इतर १३ ते १४ अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. सविता दादासो झगडे (वय ५०, रा. कवडीगाव, ता. हवेली) यांनी याबाबत फिर्याद दिली. Pune Crime News

    pune crime news lonikalbhor

    फिर्यादी यांची कवडीगाव येथील गट नंबर ४२४ मध्ये वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीचा वाद सध्या न्यायालयप्रविष्ट असताना, आरोपी चित्तरंजन गायकवाड यांनी २९ जून रोजी दहा ते बारा अज्ञात लोकांच्या मदतीने शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील मुळा व मका पिकांचे तसेच पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान केले. तसेच, क्रेनच्या मदतीने शेतात ‘डेमो हाऊस’ बसवण्याचा प्रयत्न केला. याला फिर्यादींचा मुलगा हर्षल झगडे आणि पुतण्या प्रणव झगडे यांनी विरोध केला असता, आरोपी गौरी गायकवाड यांच्या सांगण्यावरून ओम गायकवाड आणि त्यांच्यासोबत आलेल्या सात ते आठ बाउन्सरनी बेदम मारहाण केली. तसेच, “यापुढे शेतात दिसलात तर मारून टाकू,” अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे पुढील तपास करत आहेत.

    हेही वाचा: PUNE NEWS : ‘अद्वितीय पुणे’ आता ‘पुणे प्रथम’

    PUNE NEWS : महिलांच्या नावे असलेल्या निवासी मिळकतीला करात ५०% सवलतीवर शिक्कामोर्तब

    शेअर करा