Pune News : ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी नवीन केंद्रे सुरू: आरटीओची माहिती
Pune News : पुणे, मिरर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे (आरटीओ) यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रात ऑटोरिक्षांची सुधारित भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे, मिरर : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे (आरटीओ) यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रात ऑटोरिक्षांची सुधारित भाडेदरवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. या भाडेदरवाढीनुसार ऑटोरिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करून (बदलून) त्यांची अंतिम तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विविध ठिकाणी मीटर तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
ऑटोरिक्षा चालक व मालकांच्या सोयीसाठी आरटीओ ने चार प्रमुख ठिकाणांची निश्चिती केली आहे:https://maharashtramirror.com/ Pune News
१. अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर (पूर्वीपासून सुरू)
२. इऑन आयटी पार्कजवळ, खराडी पोलीस चौकीसमोर, खराडी (२२ सप्टेंबर २०२६ पासून)
३. सिंचननगर, रेंजहिल्स कॉर्नर, शिवाजीनगर (२२ सप्टेंबर २०२६ पासून)
४. रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नंबर ३, रामटेकडी (२२ सप्टेंबर २०२६ पासून)
वेळ व वेळापत्रक:
या केंद्रांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ ते दहा या वेळेत, तर शनिवारी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मीटर तपासणीचे काम चालणार आहे. दर रविवारी आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी हे कामकाज पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.




