Pune Accident Case : गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा.. ससून रुग्णालय…. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Pune Accident Case : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये छेडछाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून संतापजनक प्रतिक्रिया
2 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar On Pune Accident Case : ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये छेडछाड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून संतापजनक प्रतिक्रिया
पुणे :- कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारने बाईकला धडक Pune Accident Case दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत 17 वर्षीय अल्पवयीन कार चालवत होता. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता पुणे पोलिसांनी ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली आहे.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपाखाली ससून जनरल हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ससुनचे डॉ अजय तावरे व डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या सर्व घडामोडींवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली आहे. ससून रुग्णालय हे गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा झाल्याचे सांगितले आहे. Pune Porsche car accident Latest Update
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की 'गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा ' आहे?
Web Title : Pune Accident Case : Shelter to save the criminals.. Sassoon Hospital…. Leader of Opposition Vijay Wadettiwar
हेही वाचा: Pune Porsche car accident : ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड प्रकरणी ससूनचे डॉ. तावरे, डॉ. हरलोर यांना अटक




