मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pritam Janardan Mhatre : खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू

“शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा”

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pritam Janardan Mhatre : खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालय सुरू

“शेकाप नेते प्रितम जनार्दन म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा”

उरण - गेल्या वर्षभरापासून सिडको CIDCO आणि रेल्वे प्रशासन Railway यांच्यात बामणडोंगरी Bamandongri आणि खारकोपर रेल्वे स्टेशन Kharkopar Railway Station येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे तेथील शौचालये बंद आहेत. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होता.

छायाचित्रे · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

हा विषय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे Pritam Janardan Mhatre यांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि रेल्वे प्रवाशांनी सांगितला त्यासोबतच इतर समस्या सुद्धा त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
त्यावर कार्यवाही म्हणून त्वरित उलवे परिसरातील पाण्याची समस्या आणि इतर सिडकोची अपुरी विकास कामे यासंदर्भात समस्या निवारणासाठी त्यांनी रायगड भवन येथे संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यातून सकारात्मक निर्णय झाले त्यावर त्यांना त्वरित कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानुसार सिडको ने कार्यवाही केली आहे. बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील पाण्याच्या कनेक्शन अभावी बंद असलेले शौचालय आज पाणी जोडणी झाल्यामुळे पुन्हा सुरू करण्यात आले आणि रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला.

हेही वाचा: Team India Mumbai Parade: मरिन ड्राईव्हवर चाहत्यांचा महासागर !

शेअर करा