मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sangola news : सांगोल्यात भाजपच्या माजी युवा तालुकाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या! पत्नीचा शिंदे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप; मास्टरमाइंडला कठोर शिक्षेची मागणी

Sangola news : सांगोला : तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सांगोल्यात भाजपच्या माजी युवा तालुकाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या! पत्नीचा शिंदे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप; मास्टरमाइंडला कठोर शिक्षेची मागणी
सांगोल्यात भाजपच्या माजी युवा तालुकाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या! पत्नीचा शिंदे गटाच्या नेत्यावर गंभीर आरोप; मास्टरमाइंडला कठोर शिक्षेची मागणी

Sangola news : सांगोला : तालुक्यात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष प्रतापसिंह ऊर्फ गब्बर करचे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास तिप्पेहळ्ळी परिसरात हा थरार घडला. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येमागे राजकीय कट असल्याचा गंभीर आरोप मृत प्रतापसिंह यांच्या पत्नी अर्चना करचे यांनी केला आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेशी संबंधित नेत्यांवरही त्यांनी आरोप केले आहेत.https://maharashtramirror.com/ Sangola news

मध्यरात्री नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापसिंह करचे हे २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सांगोल्याहून आपल्या गावी जात होते. यावेळी तिप्पेहळ्ळी परिसरातील पुलाजवळ त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यासोबत असलेल्या संशयित आरोपींनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतापसिंह यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हर्षवर्धन ऐवळे आणि विक्रम घरडे या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधितांचा सहभाग याचा तपास पोलीस करत आहेत..https://maharashtramirror.com/ Sangola news

पत्नी अर्चना करचे यांचे गंभीर आरोप


पतीच्या हत्येनंतर अर्चना करचे यांनी न्यायासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझे पती भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष होते. राज्यात भाजपचे सरकार असतानाही आम्हाला अद्याप न्याय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या हत्येमागे सूत्रधार असल्याचा दावा करत अर्चना करचे यांनी तानाजी पाटील, शिवाजी पाटील आणि रोहन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या तिघांनी पप्पू करचे आणि प्रमोद भोसले यांना सुपारी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हत्येच्या मास्टरमाइंडला कठोर शिक्षा द्या!
प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्यांवरच कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण हत्येचा कट कोणी रचला, याचाही शोध घेतला पाहिजे. हत्येमागील मास्टरमाइंडला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी अर्चना करचे यांनी केली आहे. दरम्यान, या हत्येमागे राजकीय वाद आहे की अन्य काही कारण, याबाबत अद्याप तपासातून अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. पत्नीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, पोलीस तपासात आणखी कोणती नावे समोर येतात आणि हत्येचा सूत्रधार कोण आहे, याकडे आता सांगोला तालुक्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा