मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prasad Lad : नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल….

Prasad Lad नटरंग संजय राऊतला महाराष्ट्रातील जनताच त्याची जागा दाखवेल

V
Vivek

2 मिनिट वाचन

Prasad Lad

Prasad Lad नटरंग संजय राऊतला महाराष्ट्रातील जनताच त्याची जागा दाखवेल

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जोरदार पलटवार केला आहे. एकेरी शब्दांत राऊत यांच्यावर टीका करत असताना लाड यांची जीभ घसरली. नटरंगी नाच्या, जनता चपलेने तोंड फोडेल असा घणाघात लाड यांनी केला आहे.

मोदी देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान यावेळी लाड यांनी राऊतांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील 130 कोटी जनतेचा स्वाभिमान आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत नावाचा नाच्याला हे माहीत नाही. सकाळी उठून लिपस्टीक, पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही बोललं जातंय. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला जातोय", असे लाड म्हणाले. Prasad Lad

जनता तुला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाही तसेच संजय राऊत यांना उद्देशून 'अरे नटरंगी नाच्या महाराष्ट्र, देशातील जनता तुला चपलेने मारल्याशिवाय, तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प राहणार नाही,' असं प्रसाद लाड म्हणाले. तसेच संजयजी तुम्ही अशा प्रकारचं हीन कृत्य परत केले, तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही. संज्या तुला सांगतो तुला मी सोडणार नाही, असा एकेरी उल्लेख करत इशाराही प्रसाद लाड यांनी संजय राऊतांना दिला. Prasad Lad

काय म्हणाले होते संजय राऊत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दौरा 25 कोटींचा असतो. ते सरकारी पैशांतून भाजपचा प्रचार करत आहे. हाच मोठा भ्रष्टाचार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुणीही पंतप्रधान नसतो. मात्र तरीही मोदी सरकारी पैशातून दौरा करत आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी मोदी यांची विनोदी अभिनेता जॉनी लिव्हरशी तुलना केली आहे. मोदी हे गुजरातचे जॉनी लिव्हर आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी कला होता. Prasad Lad

तसेच राऊत म्हणाले, "एका सभेत मोदी म्हणाले की आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही. मात्र त्याच सभेत त्यांच्या आजूबाजूला 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले असतात. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी 5 भ्रष्टाचारी लोकांचा प्रवेश होते. हे सर्व लोक अट्टल भ्रष्टाचार असतात. मोदी या भ्रष्ट लोकांचे काय करणार आहेत. मोदी हा सर्वांत मोठा विनोद रोजच करतात. जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी आमचं मनोरंजन करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत", असे राऊत म्हणाले. Prasad Lad

हेही वाचा: Madha Lok Sabha Constituency : या जागेवर ट्विस्ट येणार, या नेत्याने शरद पवारांची भेट घेतली, त्यांना तिकीट मिळणार का?

शेअर करा