मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prakash Mahajan : "मनसेत दिवाळी… पण माझ्या घरात अंधार!" – प्रवक्ते प्रकाश महाजन यांची खंत उफाळली

Prakash Mahajan On MNS Meeting : इगतपुरी शिबिरात निमंत्रण न मिळाल्याने महाजन नाराज; पक्षात अंतर्गत संवादाचा सूर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prakash Mahajan : "मनसेत दिवाळी… पण माझ्या घरात अंधार!" – प्रवक्ते प्रकाश महाजन यांची खंत उफाळली

Prakash Mahajan On MNS Meeting : इगतपुरी शिबिरात निमंत्रण न मिळाल्याने महाजन नाराज; पक्षात अंतर्गत संवादाचा सूर

नाशिक :- इगतपुरी येथे सुरू असलेल्या मनसेच्या तीन दिवसीय शिबिरात निमंत्रण न मिळाल्याने पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन Prakash Mahajan नाराज झाले आहेत. त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करताना, "मनसेत दिवाळी आहे, पण माझ्या घरात अंधार आहे," अशा शब्दांत आपली खंत व्यक्त केली आहे.

महाजन यांनी "देव बदलणार नाही, पण देवाने बोलावल्याशिवाय देवळात जाणार नाही," अशी भूमिका घेत अंतर्गत नाराजीचा आवाज स्पष्ट केला. इतकंच नव्हे, तर "मी इतर कुणावर नाही, तर स्वतःवर नाराज आहे," असं सांगत त्यांनी आपल्या योगदानाची आठवण करून दिली. "प्रवक्ते म्हणून मी महाराष्ट्र सैनिकांना अभिमान वाटावा असंच काम केलं," असंही ते म्हणाले.

मनसे-शिवसेना युतीबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडणारे महाजन आणि वैभव खेडकर हे दोघेच शिबिरातून वगळले गेल्याने, त्यामागे ‘राजकीय संकेत’ असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, महाजन यांच्या नाराजीची दखल घेऊन मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. बुधवारी सकाळी बाळा नांदगावकर यांनीही त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. नांदगावकर यांनी हे शिबिर MMR विभागापुरते मर्यादित असल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी निमंत्रण न मिळाल्यामुळे महाजन यांची झालेली खंत पक्षातील अंतर्गत वातावरणाचे संकेत देऊन जाते.

शेअर करा