मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

राजकीय 'भू-कंपाचे संकेत'! - शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट; महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांचा पाढा वाचला

•बीडमधील तीन खून प्रकरणांवरून थेट दिल्लीत धाव; अतिवृष्टीग्रस्तांसाठी NDRF कडून भरीव मदत आणि निवडणुकीतील हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

राजकीय 'भू-कंपाचे संकेत'! - शरद पवार गटाच्या खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट; महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांचा पाढा वाचला

•बीडमधील तीन खून प्रकरणांवरून थेट दिल्लीत धाव; अतिवृष्टीग्रस्तांसाठी NDRF कडून भरीव मदत आणि निवडणुकीतील हिंसाचारावर कठोर कारवाईची मागणी

नवी दिल्ली :- राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या भेटीत खासदारांनी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्तींशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न अमित शाह यांच्यापुढे मांडले.

बीडमधील हत्याकांड आणि न्यायव्यवस्थेवर चिंता

खासदारांनी गृहमंत्री शहा यांचे लक्ष प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे वेधले. त्यांनी बीड जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली:
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर शासन व्हावे.

स्व. महादेव मुंडे खून प्रकरणी तपास प्रगतीपथावर नसून, मारेकऱ्यांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी.

स्व. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी जलद तपास पूर्ण करून दोषींना शासन व्हावे, अशी जोरदार भूमिका मांडली.

राज्यातील आपत्कालीन मदतीचा मुद्दा

यासोबतच, खासदारांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तपशील अमित शाह यांना दिला. अतिवृष्टीग्रस्तांची दुरवस्था लक्षात घेऊन, केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्तीनिवारण कोषातून (NDRF) महाराष्ट्राला भरीव मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.

लोकशाहीतील हिंसाचारावर चिंता

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला हिंसाचार आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळलेली रोख रक्कम यावरही खासदारांनी चिंता व्यक्त केली. 'सुदृढ लोकशाहीसाठी हे चित्र योग्य नाही,' असे मत व्यक्त करत त्यांनी या गैरप्रकारांवर गृह मंत्रालयाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली.

या महत्त्वपूर्ण भेटीसाठी अमित शाह यांनी वेळ दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदारांनी त्यांचे आभार मानले.

हेही वाचा: Maharashtra Mahanagarpalika Election : महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीचे 'बिगुल' वाजले! - 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला होणार निकालांचा 'महा-स्फोट'

शेअर करा