Pimpri News : वृद्धेचे हातपाय बांधून सुमारे ६५ तोळे सोने आणि १२ लाखांची रोकड लुटली
Pimpri News : पिंपरी: रुपीनगर तळवडे येथे राहणाऱ्या भारती मारुती भालेकर या वयोवृद्ध महिलेच्या पहिल्या मजल्यावरील घरात शिरून ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १२ लाख रुपये रोख लुटून नेली.
1 मिनिट वाचन

Pimpri News : पिंपरी: रुपीनगर तळवडे येथे राहणाऱ्या भारती मारुती भालेकर या वयोवृद्ध महिलेच्या पहिल्या मजल्यावरील घरात शिरून ३ ते ४ अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि १२ लाख रुपये रोख लुटून नेली. यावेळी वृद्धेचे हातपाय, तोंड, डोळे बांधून ठेवत ही लुटमार करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pimpri News
मध्यरात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास ही लुटमार झाली, तेव्हा घरामध्ये तळमजल्यावर पीडित महिलेचा मुलगा व सून असे दोघे होते. सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शहरातील पोलिस दलातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तपास सुरू करण्यात आला आहे.




