मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

महिनाभरात पेट्रोल १३० रुपयांवर जाईल: जयंत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली; वाशिममधील इंधन तुटवड्यावर रोहित पवारांची चिंता

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

महिनाभरात पेट्रोल १३० रुपयांवर जाईल: जयंत पाटील

देवेंद्र फडणवीसांच्या जुन्या ट्विटची आठवण करून दिली; वाशिममधील इंधन तुटवड्यावर रोहित पवारांची चिंता

सांगली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा ३ रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भविष्यातील आर्थिक संकटाबाबत धोक्याची घंटा वाजवली आहे. “आज ९६ रुपयांना मिळणारा डॉलर महिन्याभरात १०० रुपयांवर जाईल, तर पेट्रोलचा दर १२० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचेल,” असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे.

‘आपोआप लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती’
इस्लामपूर येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, “कोरोनाच्या काळात सरकारने लॉकडाऊन लावला होता, मात्र आताची परिस्थिती पाहता महागाईमुळे देशात आपोआपच लॉकडाऊन लागेल की काय, अशी भीती वाटत आहे. गृहमंत्र्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच ६ महिने पुरेल इतका साठा असल्याचे सांगितले होते, मात्र आता पंतप्रधान खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहेत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येते.”

मुख्यमंत्र्यांवर निशाणा
जयंत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. २०१३ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी जेव्हा काटकसरीचे आवाहन केले होते, तेव्हा आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे ट्विट केले होते. मात्र, आज तेच मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा करू नका, असे सांगत आहेत, असे म्हणत पाटलांनी फडणवीसांच्या बदललेल्या भूमिकेवर टीका केली. तसेच सर्व मंत्री आता दुचाकीवरून फिरून इंधन बचतीचे अनुकरण करतील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इंधन तुटवड्यावरून 'राडा’
राज्यात अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवू लागला असून वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन डिझेल भरण्यासाठी मारामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले.

रोहित पवारांची मागणी: शेतकऱ्यांना प्राधान्य द्या
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही वाशिममधील व्हिडिओ शेअर करत सरकारवर टीका केली आहे. “पावसाळा तोंडावर असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. सरकारने शेतीसाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून दिले पाहिजे. हा तुटवडा जागतिक परिस्थितीमुळे नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झाला आहे,” असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

इंधनाचे योग्य नियोजन न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सांगली न्युज

शेअर करा