मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Parliament LIVE | राज्यसभेतून विरोधकांचे वॉकआऊट, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब; वक्फ विधेयकावरून संसदेत प्रचंड गदारोळ सुरू आहे.

Parliament LIVE | वक्फ दुरुस्ती विधेयकावरील JPC अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Parliament LIVE | राज्यसभेतून विरोधकांचे वॉकआऊट, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब; वक्फ विधेयकावरून संसदेत प्रचंड गदारोळ सुरू आहे.

Parliament LIVE | वक्फ दुरुस्ती विधेयकावरील JPC अहवाल आज संसदेत सादर करण्यात आला. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता.

ANI :- विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. जेपीसीचा अहवाल सभागृहात मांडल्यापासूनच विरोधी पक्षांचे नेते वक्फ विधेयकाला विरोध करत होते.Parliament LIVE |  त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने विरोधी पक्षांनी चर्चेदरम्यानच सभागृहातून सभात्याग केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावर सादर केलेल्या जेपीसी अहवालावर म्हणाले की, हा अहवाल आपण स्वीकारत नाही. त्यांनी हा अहवाल खोटा ठरवला. जेपीसीमध्ये काही लोकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असे खरगे म्हणाले. हा अहवाल पुन्हा जेपीसीकडे पाठवावा, असेही ते म्हणाले.

वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्ष आणि भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी सांगितले की, आज आम्ही वक्फ दुरुस्ती विधेयकावर जेपीसीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयक गेल्या वर्षी सभागृहात मांडण्यात आले. त्यावेळी विरोधी पक्षांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. या विधेयकासाठी जेपीसीची स्थापना करावी आणि पुरेशा चर्चेनंतर ते सभागृहात मांडावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या खासदारांचा समावेश करून जेपीसी स्थापन करण्यात आली.गेल्या काही महिन्यांत जेपीसीच्या अनेक बैठकाही झाल्या. गेल्या बैठकीत विरोधी पक्षाच्या खासदारांनाही जेपीसीतून दिवसभरासाठी बाहेर काढण्यात आले होते.

शेअर करा