मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Police News : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने परिमंडळ 2 मधील पोलिसांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाणेे Panvel Police Station या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल Rotrary Club Of Panvel Central यांचे माध्यमातून परिमंडळ 2 अंतर्गत सर्व पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी , पोलीस अं

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Police News

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाणेे Panvel Police Station या ठिकाणी मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2, पनवेल व मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल Rotrary Club Of Panvel Central यांचे माध्यमातून परिमंडळ 2 अंतर्गत सर्व पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार व त्याचे कुटुंबियांसाठी शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल, डॉ.डी.वाय हॉस्पिटल ब्लड बॅंक, नेरूळ नवी मुंबई तसेच, पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित आरोग्य शिबिरामध्ये पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय असे एकूण 163 जणांची पूर्ण आरोग्य तपासणी ( मधुमेह, रक्तदाब, हाडांची घनता, इ सी जि, फुफुसांची तपासणी, डोळे तपासणी, दात तपासणी, रक्त तपासणी तसेच रक्तदान शिबीर ) करून मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश पोटे व प्रथम क्लब नारी वैशाली पोटे या उभायंतासह पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल पाटील यांचे सह एकूण 18 जणांनी रक्तदान केले.
सदर शिबिराचे उदघाट्न पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांनी केले. या प्रसंगी पनवेल तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील साहेब, पोलीस निरीक्षक भगत व पोलीस निरीक्षक शेलकर उपस्थित होते. Panvel Police Latest News

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

आयोजित आरोग्य शिबिरामध्ये सहभागी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य विषयक तपासणी करून मार्गदर्शन करणे करिता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे वतीने पनवेल, नवी मुंबई विभागातून एकूण 33 प्रतिष्ठित डॉक्टर उपस्थित होते. Panvel Police Latest News

सदर शिबीर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे माजी अध्यक्ष व सध्या चे मेडिकल संचालक डॉ. लक्ष्मण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोटरी सदस्य,एन्स, अनेट्स यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले. Panvel Police Latest News

हेही वाचा: Maharashtra Politics : अजित पवार गटात छगन भुजबळ नाराज! शरद पवारांच्या भेटीवर राष्ट्रवादी आणि भाजप काय म्हणाले?

शेअर करा