मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : धर्मवीर कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे यांच्यामुळे महिलेला मिळाला न्यायव्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अखेर नमले

पनवेल जितिन शेट्टी : रोडपाली येथील व्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारी धर्मवीर कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे Priynka Gade यांच्याकडे येत होत्‍या.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : धर्मवीर कामगार सेनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे यांच्यामुळे महिलेला मिळाला न्यायव्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अखेर नमले

पनवेल जितिन शेट्टी : रोडपाली येथील व्हाईट लॉटस इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याच्या तक्रारी धर्मवीर कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रियांका गाडे Priynka Gade यांच्याकडे येत होत्‍या. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासन, पोलिस ठाण्याशी Panvel Police Station संपर्क साधूनही लक्ष दिले गेले नाही. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी अशी मागणी प्रियांका गाडे यांनी पोलिस आयुक्त तसेच कळंबोली पोलिसांकडे Kalamboli Police Station केली होती.

तक्रारी आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रितेश बिजरोई यांची भेट घेतली असता आम्ही विषय हाताळतो असे त्यांनी सांगितले होते. तीन महिने उलटूनही कर्मचा-यांचे पगार भेटत नाही. हॉस्पिटल पेशंटकडून जास्तीचे बिल घेतले जाते. हॉस्पिटलच्या या गैरप्रकाराविरोधात तेथील कर्मचारी अर्चना खरात यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनाच राजीनामा देण्यास सांगितले. मानसिक छळ केला. जातीवाचक शिवीगाळ केली. पैसे वसूल करण्यासाठी हॉस्पिटल कोणत्याही थराला जाउ शकते. यात एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल का असा प्रश्न उपस्थित होतो अशी तक्रार प्रियांका गाडे यांनी समाजमाध्यमांव्दारे केली होती. मंगळवारी २० मे ला प्रियांका गाडे या आपल्या सहका-यांसह हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याठिकाणी हॉस्पिटल व्यवस्थापन यांनी लगेचच कळंबोली पोलिसांना संपर्क केला. एरव्ही कायम उशिरा पोहचणारे पोलीस यावेळी मात्र तात्काळ उपस्थित झाले. त्यानंतर झालेल्या चर्चेत हॉस्पिटल व्यवस्थापनाने तक्रारदार महिलेच्या अटी मान्य केल्या. धर्मवीर सेनेच्या प्रियांका गाडे यांच्यामुळे योग्य न्याय मिळाला त्याबद्दल महिलेने प्रियांका गाडे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी झालेल्या चर्चेत विजय पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा