मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : "पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार 2024" कार्यक्रमाचा वृत्तांत

पनवेल : 1 जुलै 2024 रोजी DOCTORS- DAY चे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात तसेच विख्यात अशा सर्व डाॅक्टरांच्या सन्मानार्थ पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार असा एक सोहळा भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह' येथे संपन्न झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : "पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार 2024" कार्यक्रमाचा वृत्तांत

पनवेल : 1 जुलै 2024 रोजी DOCTORS- DAY चे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात तसेच विख्यात अशा सर्व डाॅक्टरांच्या सन्मानार्थ पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार असा एक सोहळा भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह' येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला महानगरपालिका उपआयुक्त डाॅ. श्रीयुत वैभव विधाते प्रमुख पाहूणे म्हणून लाभले होते.

भाविप प्रांत अध्यक्ष श्री. सिमंत जी प्रधान तसेच प्रांत सचिव श्री. नितीन जी कानिटकर कार्यक्रमाला उपस्थित होते.पनवेलमधील ख्यातनाम जनरल प्रॅक्टिशनर डाॅ. श्रीनिवास वाळींबे, शल्यचिकित्सक डाॅ. जगदीशचंद्र घोडके, व बालरोगतज्ज्ञ डाॅ. मिलिंद नाडकर्णी यांना " पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले.शाल, श्रीफळ, मानपत्र व आरोग्य देवता धन्वंतरीची मुर्ती हे पुरस्काराचे स्वरूप होते. पनवेलमधील वेगवेगळ्या विषयांतील प्रविण 160 डाॅक्टर्स, पनेवलमधील प्रतिष्ठित नागरीक तसेच भाविप सदस्य, असे एकूण 300 जणांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाला उपस्थित 160 डाॅक्टर्स ना देखीलं मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी भाविप सदस्यांनी सर्व उपस्थित डाॅक्टरांच्या मनोरंजनार्थ स्वरचीत "मधुमेहावर बोलू काही…." या आगळ्या वेगळ्या संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
भारत विकास परिषद पनवेल शाखेचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच हितचिंतक सहकारी यांच्या सहयोगातून कार्यक्रम यशस्वी ठरला.

हेही वाचा: Maharashtra Politics : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 अर्ज

शेअर करा