
Panvel News : "पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार 2024" कार्यक्रमाचा वृत्तांत
पनवेल : 1 जुलै 2024 रोजी DOCTORS- DAY चे औचित्य साधून पनवेलमधील सेवाव्रती, निष्णात तसेच विख्यात अशा सर्व डाॅक्टरांच्या सन्मानार्थ पनवेल आरोग्य रत्न पुरस्कार असा एक सोहळा भारत विकास परिषद पनवेल शाखेच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह' येथे संपन्न झाला.
