मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : नेरे येथे विना परवानगी आयोजित बैलगाडा शर्यतीत अपघात, युवक मृत्यूशी देतोय झुंज

Panvel News : नेरे येथे बैलगाडा शर्यतींच्या सामन्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ढोकेगाव येथील जयेश जाधव हा गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : नेरे येथे विना परवानगी आयोजित बैलगाडा शर्यतीत अपघात, युवक मृत्यूशी देतोय झुंज

Panvel News : नेरे येथे बैलगाडा शर्यतींच्या सामन्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ढोकेगाव येथील जयेश जाधव हा गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली.

पनवेल : पनवेलमधील बैलगाडा (Panvel Bailgada Shariyat) शर्यतीमध्ये गोळीबार केल्यामुळे पोलीसांनी कारवाई केल्यामुळे राहुल पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना कारागृहात रहावे लागल्याची घटना ताजी असताना आठवड्याच्या रविवारी नेरे येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी चार वाजता या शर्यतींच्या सामन्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ढोकेगाव येथील जयेश जाधव हा गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यावर पोलिसांनी( Panvel Police News ) शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविला आहे.

पनवेल तालुक्यामध्ये दर आठवड्याला बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग त्यांच्या हातची सर्व कामे बाजूला सारुन शर्यतींचे सामने पाहण्यासाठी एकत्र येतात. यापूर्वी पनवेलच्या ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने दोन गटात राडा झाला. आणि किरकोळ भांडणातून सुरु झालेल्या या राड्यात एका गटाने थेट गोळीबार केला. पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती त्यानंतर गोळीबाराची व्हीडीओ समाजमाध्यमांवर फिरू लागल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीसांनी पनवेलमध्ये विना परवानगी बैलगाडा शर्यतीवर निर्बंध आणले होते. पनवेल तालुका पोलीसांनी याबाबत रितसर गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा: Pune Porsche Car Accident Update : आरोपी अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात पिझ्झा पार्टी केली होती का? आता पोलिसांनी हा मोठा दावा केला आहे

शेअर करा