मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : मान्सून आला आणि टपाल नाक्यावरील वीस कोटींचा रस्ता पाण्यात गेला……

पनवेल महापालिका अनभिज्ञ कशी ?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : मान्सून आला आणि टपाल नाक्यावरील वीस कोटींचा रस्ता पाण्यात गेला……

पनवेल महापालिका अनभिज्ञ कशी ? ठेकेदारावर कारवाई करावी

पनवेल / प्रतिनिधी:- गेल्या दोन - तीन दिवसांपासून पनवेलसह राज्यभरात मुसळधार पाउस सुरु आहे. या पहिल्याच पावसात टपाल नाक्याजवळील रस्त्यावर पाणी साचले, पावसाचा जोर वाढल्याने हे पाणी दुकानांमध्ये शिरले. पनवेल महानगर पालिकेने वीस कोटी रुपये खर्च करुन हा रस्ता अवघ्या काही दिवसांपूर्वी बनवला आहे. मात्र ठेकेदाराने रस्ता बांधताना पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय केलीच नसल्याचे या ठिकाणी दिसते. ऐनवेळी दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली. मग वीस कोटी रुपये खर्च नेमका कशावर केला ?


महापालिका आयुक्त फक्त कंत्राटावर सहया करतात, या रस्त्यांची पाहणी कोण करणार. नेहमीचा पाउस आणि या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय करणे ठेकेदाराला गरजेचे वाटले नाही की जबाबदार अधिका-यांनी त्याची पाहणीच केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. वीस कोटी रुपये रस्त्यावर खर्च केले असतील तर रस्त्यावर पाणी आलेच कसे. खर्च केलेले वीस कोटी रुपये नेमके कुठे गेले ? ते कोणाच्या घशात गेले याची चौकशी करावी

हेही वाचा: IPL 2025 : धोनीच्या अंतिम विजयाचा आनंद, पण चाहत्यांच्या झेंडा नेण्यावर रोकाव चर्चेत!

शेअर करा