मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान…

परिचारिकांनो…!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान…

परिचारिकांनो…! तुमच्या सेवाभावाला सलाम….

पनवेल जितिन शेट्टी : पनवेलमधील नेहमीच महिलांसाठी कार्यरत असणारी एकमेव संस्था ती म्हणजे क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन होय. महिलांना न्याय आणि सन्मान मिळवून देणारी ही संस्था असून संस्थापक/अध्यक्षा सौ.रुपालीताई शिंदे यांनी आज दि.१२ मे २०२५ रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे परिचारिकांचा छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रत्येक रुग्णाशी कसलाही दुजाभाव न करता शुश्रूषा करत आहेत. सध्या रुग्णांच्या सगळ्यात जवळची नातेवाईक ही परिचारिकाच असून,त्या 'सिस्टर' या नात्याने पूर्ण सेवा देत आहेत.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

ह्या नारी शक्तींना त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांना केक कापून व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम निकम परमार हॉस्पिटल याठिकाणी डॉक्टर माळी यांच्या सहकार्याने परिचारिका सौ अश्विनी पाटील, सौ दुर्गा पाटील, कुमारी स्नेहा, सौ सीमा, ममता मावशी आदी परिचारिकांना फॉउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ रुपालीताई शिंदे यांच्या हस्ते जागतिक परिचारिका दिनाचे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या खास दिनी सन्मान करण्यात आला. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या कारंजाडे अध्यक्षा.सौ. स्नेहा धुमाळ आणि मा.सौ.अश्विनी पाटील यांनी अथक मेहनत घेतली. यावेळी सर्व परिचारिका व इतर स्टाफ भारावून गेले होते. त्यांनी सौ. रुपाली शिंदे व त्यांच्या सदस्या यांचे मनभरून कौतुक केले व आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संम्पन्न करण्यात आला.

हेही वाचा: SSC Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर, यंदा 94.10 % विद्यार्थी झाले उत्तीर्ण!

शेअर करा