मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel News : रोज झगमगणाऱ्या वडाळे तलाव परिसरात आज तीन वाजल्यापासून बत्ती गुल… शिवसेनेच्या चंद्रशेखर सोमण यांच्या समन्वय व पाठपुराव्याने विद्युत पुरवठा रात्री नऊ वाजता पूर्ववत…

पनवेल : १ जून दुपारी तीन वाजल्यापासून वडाळे तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता व संध्याकाळी सहा सात नंतर रोज झगमगणारा वडाळे तलाव परिसर काल अंधारात बुडून गेला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel News : रोज झगमगणाऱ्या वडाळे तलाव परिसरात आज तीन वाजल्यापासून बत्ती गुल… शिवसेनेच्या चंद्रशेखर सोमण यांच्या समन्वय व पाठपुराव्याने विद्युत पुरवठा रात्री नऊ वाजता पूर्ववत…

पनवेल : १ जून दुपारी तीन वाजल्यापासून वडाळे तलाव परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता व संध्याकाळी सहा सात नंतर रोज झगमगणारा वडाळे तलाव परिसर काल अंधारात बुडून गेला. दुपारपासून झालेल्या या समस्येकडे कोणाचाही लक्ष नसताना तिथे फिरायला गेलेल्या शिवसेनेचे स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांच्या लक्षात नागरिकांनी ही गोष्ट आणून दिल्यावर महानगरपालिकेचे विद्युत पुरवठा अधिकारी व सल्लागार श्री बि आर कदम यांना फोन करून या घटनेची माहिती दिली व त्यांनी त्वरित या घटनेला वडाळे तलाव जवळील ट्रान्सफरमरचा 'डी.ओ' खराब झाल्याने ही समस्या उद्भवली असे सांगितले.

सोमण यांनी लागलीच त्वरित महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता सहाय्यक अभियंता किशोर पाटील हे त्वरित आपला लाईनमनच्या स्टाफसह जागेवर उपस्थित झाले. तिथे उपस्थित महावितरणचे कर्मचारी श्री सानप, श्री राठोड व श्री मते यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात करत दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर नवीन डी.ओ ट्रान्सफॉर्मर मध्ये बसवून वडाळे तलाव व आसपास परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केला. यावेळेस श्री सोमण हे स्वतः दोन तास प्रत्यक्ष जागेवर कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून महापालिका व महावितरण यांच्यात यशस्वी समन्वय साधला व झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत स्वतःच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजता हा विद्युत पुरवठा पूर्ववत करून दिला. तेथील नागरिकांनी महावितरणचे सर्व अधिकारी व शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांचे आभार मानले.

हेही वाचा: Dilip Joshi In Panvel : कळंबोलीत व्ही एन इलेक्ट्रॉनिक्स शोरूम अभिनेते दिलीप जोशी (जेठालाल) यांच्या हस्ते भव्य शुभारंभ

शेअर करा