मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Murder News : पनवेल शिरढोण, येथील महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमच्या शेजारी अज्ञात मृतदेह,खुनाचा अवघ्या 12 तासात उलगडा

Panvel Police Solved Murder Mystery In 12 Hours : गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई ; शिरढोण, पनवेल सापडलेल्या मृतदेहाचा 12 तासात केला उलगडा

V
Vivek

3 मिनिट वाचन

Mumbai Murder News: "Husband slits his throat to death – wife writes bloody end for lover!"
Mumbai Murder News: "Husband slits his throat to death – wife writes bloody end for lover!"

Panvel Police Solved Murder Mystery In 12 Hours : गुन्हे शाखा कक्ष-2 यांची कारवाई ; शिरढोण, पनवेल सापडलेल्या मृतदेहाचा 12 तासात केला उलगडा

पनवेल :- शिरढोण ,मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या महेंद्र ट्रॅक्टर शोरूम च्या शेजारी हायवेवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. "Mystery in Panvel: Dead Body Found in Mahindra Tractor Showroom" गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी अवघ्या बारा तासात मृतदेहाची ओळख पटवून आरोपीला जेरबंद केले आहे. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. Panvel Police Latest News

"Murder in Panvel: Police Detain Suspect in 12-Hour Body Discovery Case"

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 ऑगस्टच्या सकाळच्या दरम्यान महेंद्र ट्रॅक्टर शोरूम च्या मुंबई गोवा महामार्गाच्या लगत एक मृतदेह आढळल्याचे पोलिसांना सांगितले होते. तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. "Panvel Police Uncover Strange Connection in Tractor Showroom Death Mystery" पनवेल शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजयकुमार लांडगे यांचे एक पथक घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि आरोपीचे आर्थिक व्यवहार याकरिता चार पथके तयार करण्यात आली होती. Panvel Police Latest News

"Trending News Alert: Police Arrest Suspect in Connection with Mysterious Death at Mahindra Tractor Showroom"

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी मयत व्यक्ति काम करत असलेल्या ठिकाणाची कामगाराकडे तपासणी केली असता मयत आणि आरोपी यांचे आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्याचा तांत्रिक तपास ,तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती काम करणारा इतर व्यक्ती अमितकुमार रामआश्रय राय (20 वर्ष,रा.शिरढोण, पनवेल मुळ, रा. औरंगाबाद बिहार) याच्यासोबत आर्थिक व्यवहार झाले होते.या संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता अमितकुमार यांने मयत व्यक्ती यांच्यासोबत असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून जीवे ठार मारल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील चौकशी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली जात आहे. पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला अटक केली असून खुनाचा उलगडा केला आहे. Panvel Police Latest News

पोलीस पथक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, गुन्हे शाखा कक्ष 2, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, प्रताप देसाई, मानसिंग पाटील, गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेल तसेच मध्यवर्ती कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, महेश जाधव, सतिश भोसले, पोलीस उपनिरीक्षक, संजय रेडड़ी, राहुल भदाणे व गुन्हे शाखा कक्ष 2 चे पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. Panvel Police Latest News

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : नवी मुंबई कळंबोली येथे नोकरीच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला

हेही वाचा: Navi Mumbai Fake Call Center : नवी मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीर कॉल सेंटरचा केला पर्दाफाश

हेही वाचा: Dombivli Drug Mafia Arrested : डोंबिवली शहरात "एम.डी किंग" म्हणून ख्याति असलेला ड्ग्ज माफिया आणि त्याच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

हेही वाचा: Navi Mumbai Drug Settlement : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील आरोपीला पोलिसांची सेटलमेंट करण्यासाठी 21 लाख मागणाऱ्या खाजगी व्यक्तीला एसीबीने ठोकल्या बेड्या

हेही वाचा: Badlapur Police Bribe News : बदलापूर पोलीस ठाण्याचे,पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

शेअर करा