मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Marathon News : रायगडातील पहिली पूर्ण मॅरेथाॅन 1 डिसेंबर ला पनवेलमध्येमहानगरांचे वैभव जसं पनवेलला येतंय तशा समस्या देखील येतील;आ.प्रशांत ठाकूर यांची सतर्कतेची जाणीव

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं Panvel Marathon आयोजन पनवेलमध्ये 1डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Marathon News : रायगडातील पहिली पूर्ण मॅरेथाॅन 1 डिसेंबर ला पनवेलमध्येमहानगरांचे वैभव जसं पनवेलला येतंय तशा समस्या देखील येतील;आ.प्रशांत ठाकूर यांची सतर्कतेची जाणीव


पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं Panvel Marathon आयोजन पनवेलमध्ये 1डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि संकेतस्थळाचे प्रकाशन आ.प्रशांत ठाकूर MLA Prashant Thakur यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी 67 वर्षीय धावपटू अजित कंबोज,डाॅ.कल्याणी पाटील,सुरेश रिसबूड, आयोजक प्रफुल वाजे,तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन चे सतीश शेट्टी आदी उपस्थित होते.

यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात , पनवेल हे मुंबई सारख्या महानगराच्या जवळ आले आहे.महानगरातील वैभव पनवेलमध्ये येत आहेत तशा समस्या,अडचणी देखील आपल्याकडे येणार आहेत.त्याला सामोरे जाताना आपण चांगल्या बाबींना आत्मसात करून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मॅरेथॉन स्पर्धेमुळे पनवेलच्या वैभवात भर पडणाफ आहे.अशा या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. यासोबतच खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचं गरजेचं असल्याचं प्रशांत ठाकूर म्हणाले. तर ज्येष्ठ धावपटू अजित कंबोज यांनी , जिद्दीने खेळलो तर काहीही अशक्य नाही.पळत रहा आणि आरोग्याला देखील लांब पळवत रहा असा मंत्र देखील कंबोज यांनी दिला.

डॉ. कल्याण पाटील यांनी मॅरेथॉनचं आणि धावण्याचं आरोग्य दृष्टीनं महत्त्व पटवून दिलं. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार ठाकूर यांनी केलं. दरम्यान या मॅरेथॉन स्पर्धेसाठी नोंदणी करायची असल्यास indiarunning आणि Townscript वर ऑनलाइन पद्धतीनं करता येईल. आगामी काळात या स्पर्धेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहेत याची माहिती देखील वेळोवेळी देण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Who is Akshay Shinde : बदलापूर प्रकरणातील अटक आरोपी अक्षय शिंदेविरोधात न्यायालयाचा मोठा निर्णय, 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा: Mumbai Breaking News :बदलापुरात प्रशासनाने इंटरनेटवर बंदी घातली, तब्बल 10 तासानंतर रेल्वेसेवा सुरू

शेअर करा