मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !

मुलीसह दोन आरोपी गजाआड

V
Vivek

2 मिनिट वाचन

Panvel Crime News : जन्मदात्या आईला ठार मारण्याचा रचला मुलीनेच कट !

मुलीसह दोन आरोपी गजाआड

पनवेल : स्वतःच्या जन्मदात्या आईलाच ठार मारण्याचा कट मुलीने रचला व त्यात ती यशस्वी झाली. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सखोल तपासामध्ये अखेरीस हे निष्पन्न झाले व त्यांनी कट रचणाऱ्या मुलीसह प्रत्यक्ष खुन करणाऱ्या दोघा तरुणांना गजाआड केले आहे.प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून याप्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे. मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती.


दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणितालाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. मित्र विशाल पांडे याच्या मदतीने विवेकने १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली. रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आले असता प्रिया बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि नितीन ठाकरे, पो.नि. प्रवीण भगत यांच्यासह सपोनि प्रकाश पवार, सुनील वाघ, राजेंद्र घेवडेकर, सुषमा पाटील, स्वप्नील केदार, पोउपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा. परेश म्हात्रे, वाघमारे, वायकर, भोसले, डोईफोडे, शेवाळे, पाटील, सोनवणे, पो.ना. महेश पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला असता अधिक तपासात विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपींची २३ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे अजून गुन्ह्याची उकल होणार असल्याची माहिती सहा. पो. आयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

हेही वाचा: Mumbai Crime News : भायखळा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 14.61 लाखांचा मुद्देमाल जप्त

शेअर करा