मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : पनवेलमधील नाईट रायडर्स बार पुन्हा सुरू; मनसेच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह..!!

पनवेल महाराष्ट्र मिरर : मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर आक्रमक कारवाई करत तोडफोड केली होती.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : पनवेलमधील नाईट रायडर्स बार पुन्हा सुरू; मनसेच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह..!!

पनवेल महाराष्ट्र मिरर : मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर आक्रमक कारवाई करत तोडफोड केली होती. राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी "छत्रपतींच्या पवित्र भूमीत डान्स बार चालू देणार नाही" असा इशारा देत बार उद्ध्वस्त केला. मात्र, अवघ्या काही तासांतच हा बार पुन्हा सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसेच्या या आंदोलनाला स्थानिकांनी पाठिंबा दर्शवला असला, तरी बार पुन्हा सुरू होणे हे प्रशासनाच्या कारवाईतील ढिसाळपणाचे द्योतक मानले जात आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी पसरली असून, मनसेच्या आंदोलनाचा हा केवळ दिखावा होता की खरोखरच कारवाईची मागणी होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असले, तरी बार मालकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या घटनेने डान्स बारवरील बंदीच्या मुद्द्याला पुन्हा ताजे केले असून, सरकार आणि प्रशासन याबाबत किती गंभीर आहे, याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

हेही वाचा: Samana Agralekh : ‘सामना’चा सरकारवर थेट हल्ला: “जातीय सलोखा बिघडवणारे सरकारमध्येच”

शेअर करा