मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : कामोठे महामार्गावर १७ लाखांचा गुटखा जप्त, टेम्पो चालकाला अटक

पनवेल जितिन शेट्टी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठे शहरानजीकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी काल रात्री एका टेम्पोवर धाड टाकली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : कामोठे महामार्गावर १७ लाखांचा गुटखा जप्त, टेम्पो चालकाला अटक

पनवेल जितिन शेट्टी : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावरील कामोठे शहरानजीकच्या उड्डाणपुलावर अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कामोठे पोलिसांनी काल रात्री एका टेम्पोवर धाड टाकली. यावेळी १७ लाख ४० हजार रुपये किंमतीचा बेकायदा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली असून, ५ लाख रुपये किंमतीचा टेम्पोही जप्त केला आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरे आणि कामोठे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारा टेम्पो रोखून तपासणी केली असता, त्यातून महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा आढळून आला. टेम्पो चालक फरहान मजीद शेख (वय २३, रा. कांदिवली) याला ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निवडी (ठाणे) येथील शौकत अली याचा पोलिस शोध घेत आहेत; मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. जप्त केलेल्या टेम्पोची किंमत ५ लाख रुपये आहे. हा गुटखा विक्रीसाठी कोठे नेण्यात येत होता, याचा तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

या प्रकरणी पोलिस हवालदार जनार्दन सहदेव पवार यांनी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्री करणारे एजंट आणि दुकानदार सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

हेही वाचा: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; हिरव्या साड्या, बांगड्यांनी बाजारपेठा फुलल्या!

शेअर करा