मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : अवैधरीत्या गौमांसची वाहतूक करणाऱ्या 4 जणांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

•गौमांस वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक, तिघे फरार पनवेल शहर पोलिसांची कारवाई, जागृत नागरिकांची कामगिरी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : अवैधरीत्या गौमांसची वाहतूक करणाऱ्या 4 जणांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

•गौमांस वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक, तिघे फरार पनवेल शहर पोलिसांची कारवाई, जागृत नागरिकांची कामगिरी

पनवेल जितिन शेट्टी : महाड येथून गोवंशाची कत्तल करून गोवंषवर्गिय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देषाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्यास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळस्पे फाटा येथे जागरूक नागरिकांच्या मदतीने अडवले असून यावेळी 4 जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 3 जण पसार झाले आहे.

महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गौमांसची वाहतूक करणार असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाला मिळाली. त्याने तात्काळ याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पळस्पे चौकी येथे असलेले पोलीस कर्मचारी पोलीस नाईक जगताप, पोलीस शिपाई मोकल यांना सदर घटना सांगितली. तात्काळ पोलिसंनी पळस्पे पोलीस बिट चौकी समोरील ब्रिजखाली येथे सापळा रचून संशयित वाहने पनवेलच्या दिशेने येताना दिसताच त्यांना थांबवले. यावेळी वाहनांमध्ये असलेले 7 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी सलमान शेख (वय 30, रा.कुर्ला), फैजल दसुलकर (वय 29,रा.कुर्ला), अमीर खान (वय 42, रा.घाटकोपर), काषीद खान (वय 22, रा.विक्रोळी) या चौघांना पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले तर इतर तिघे जण पळून गेले. यावेळी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीत लाल रंगाचे मोठ्या जनावरांचे गोवंषवर्गिय काळया ताडपत्रीत झाकलेले अंदाजे 500 ते 600 किलो मास व मास कापण्याचे हत्यार आढळून आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 3(5), 325 आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976 कलम 5 बी, 5 सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Prashant Thakur : विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली आमदार पदाची शपथ..!!

शेअर करा