मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pandharpur News : 'व्हीआयपी दर्शन’वर बंदी; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

•Pandharpur Ashadhi Wari VIP Pass : भाविकांचा विजय : सामान्यांची श्रद्धा महत्त्वाची, सत्तेचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pandharpur

•Pandharpur Ashadhi Wari VIP Pass : भाविकांचा विजय : सामान्यांची श्रद्धा महत्त्वाची, सत्तेचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही

पंढरपूर | आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करत श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात 'व्हीआयपी दर्शन' पास देण्यास सक्त मनाई केली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

या आदेशानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. भाविकांच्या स्वागतार्थ हे धाडसी पाऊल उचलण्यात आले असून, सामान्य श्रद्धाळू वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या काळात पंढरपूरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. मात्र या गर्दीत अनेक लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते 'व्हीआयपी पास'च्या माध्यमातून थेट मंदिरात प्रवेश घेतात, परिणामी सामान्य भाविक तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभे राहतात. ही अन्यायकारक परिस्थिती आणि त्यातून निर्माण होणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने 2010 मध्येच यात्रा व सण उत्सवांच्या मुख्य दिवशी विशेष दर्शन सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण तरीही दबाव, विनंती किंवा 'ओळखी'च्या आधारे काहीजण प्रवेश मिळवतात. यामुळे वाद निर्माण होतात आणि व्यवस्थेला तडजोड करावी लागते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "गर्दीच्या पार्श्वभूमीवर जर कोणी व्हीआयपी पास देण्याचा प्रयत्न केला, किंवा विनंती मान्य करून नियम मोडले, तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल."

हा निर्णय सामान्य भक्तांच्या श्रद्धेला न्याय देणारा असून, यात्रा काळात सर्वांसाठी समानता पाळली जावी, या हेतूने शासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

हेही वाचा: Mumbai Crime News : 'रेस्टॉरंटला रेटिंग द्या, दिवसाला 5 हजार कमवा' सांगून जोगेश्वरीतील महिलेला 4 लाखांचा गंडा

शेअर करा