मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

OBC Reservation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

OBC Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाला यश, हाके आणि वाघमारे यांचे आंदोलन तूर्तास मागे..

V
Vivek

2 मिनिट वाचन

OBC Reservation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी त्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

OBC Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाला यश, हाके आणि वाघमारे यांचे आंदोलन तूर्तास मागे..

जालना :- आज सरकारचे शिष्ट मंडळ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Lakshman Hake) आणि वाघमारे यांच्या भेटीला पोहोचले. या शिष्टमंडळात राज्याचे पाच मंत्रासह बारा जण सहभागी होते.शिष्टमंडळाचे चर्चा करून तूर्तास ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे साथीदार वाघमारे यांना सर्व मागण्या संदर्भात सरकार पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्याने हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. OBC Reservation Latest News

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणी करिता गेले दहा दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते. मंत्री धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ,प्रकाश शेडगे आणि गोपीचंद पडळकर हे हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्री मध्ये दाखल झाले होते. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पेत हाके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. OBC Reservation Latest News

नाव न घेता छगन भुजबळ यांचा इशारा

भुजबळ यावेळी बोलतांना यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. "आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. जमाना जानता हैं हम किसीके बाप से नहीं डरते. आपल्याला या दोघांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. लढण्यासाठी दोन्ही वाघ पुन्हा मैदानात पाहिजे आहेत. आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला तुम्ही वेगळे आरक्षण द्या. ", असे भुजबळ यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले तसेच "बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यात आला. त्या कधीही कोणाच्या विरोधात बोलल्या नाहीत. तरीही काहींनी त्यांना विरोध केला. गरिबांना अधिक देण्याचे काम केले पाहिजे. जातनिहाय जनगणनेला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. ही लढाई अजून संपलेली नाही. राज्यातील अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटण्यात आले. आपल्यावर अन्याय होतोय, अजून किती सहन करणार असे म्हणत हातात हात धरून बसलात तर काहीही होणार नाही", असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले आहे. OBC Reservation Latest News

हेही वाचा: Bharat Shah : शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले, उत्तर पश्चिम मुंबईतील अपक्ष उमेदवाराला आव्हान

शेअर करा