मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

आता यंत्रांनाही कुलरचा आधार!

वाढत्या पाऱ्यामुळे महावितरणची धडपड

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

आता यंत्रांनाही कुलरचा आधार!

वाढत्या पाऱ्यामुळे महावितरणची धडपड


गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, या कडाक्याच्या उन्हाचा चटका केवळ मानवी जीवाची लाहीलाही करत नसून, तांत्रिक यंत्रणेलाही त्याचा फटका बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफार्मरचे तापमान धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने, गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली येथील उपकेंद्रात यंत्रणेला थंड ठेवण्यासाठी महावितरणला चक्क कुलर लावावा लागला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. अल्लापल्ली येथील १३२ केव्ही उपकेंद्रावर सध्या प्रचंड ताण आहे. वाढत्या लोडमुळे ट्रान्सफार्मरमधील ऑइल गरम होते, त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांवर पोहोचल्याने यंत्रणेवर दुहेरी मारा होत आहे. ट्रान्सफॉर्मर मर्यादेपेक्षा जास्त तापल्यास त्यात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट होण्याची किंवा वीजपुरवठा दीर्घकाळ ठप्प होण्याची भीती असते. ही आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला एसी बसवला आहे.
येथील मुख्य ट्रान्सफार्मरला अतीगरम होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे लोखंडी कुलर बसवण्यात आले आहेत. या कुलरच्या माध्यमातून सतत थंड हवा सोडून यंत्रणेचे तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माणसांप्रमाणेच आता यंत्रांनाही कुलरचा आधार घ्यावा लागत असल्याने विदर्भातील उन्हाच्या तीव्रतेची भीषणता अधोरेखित होत आहे.

Now machines also have cooler support!

शेअर करा