मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nilesh Rane : निवडणुकीच्या तोंडावर मालवणमध्ये 'स्टिंग ऑपरेशन'चा धमाका!

• भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर 'बनावट जात प्रमाणपत्रा'चा आरोप, निलेश राणेंकडून पुरावे सादर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nilesh Rane : निवडणुकीच्या तोंडावर मालवणमध्ये 'स्टिंग ऑपरेशन'चा धमाका!

•भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर 'बनावट जात प्रमाणपत्रा'चा आरोप, निलेश राणेंकडून पुरावे सादर

सिंधुदुर्ग :- मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप (BJP), शिंदे सेना (Shinde Sena) आणि ठाकरे सेना (Thackeray Sena) यांच्यात मोठी चुरस असताना, या निवडणुकीत माजी आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 'स्टिंग ऑपरेशन' करत राजकीय भूकंप घडवला आहे.

निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत (Shilpa Khot) यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा राणे यांनी केला असून, या आरोपाच्या पुष्टीसाठी त्यांनी काही पुरावेही (Evidence) सादर केले आहेत. राणे यांच्या या 'स्टिंग'मुळे मालवणच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

राणे यांनी यावेळी नमूद केले की, शिल्पा खोत यांनी जनतेची दिशाभूल केली आहे आणि त्याबद्दल त्यांनी माफी मागावी. खोत या समाजसेविका असल्याचा दावा करत असल्या तरी, या प्रकरणाने त्यांच्या उमेदवारीवर आणि प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.विशेष म्हणजे, आरोप करताना राणे यांनी भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टीका करण्याचे टाळले. मात्र, निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेल्या या गौप्यस्फोटामुळे मालवणमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar News : दिल्लीच्या स्फोटानंतर खळबळ! तोतया IAS महिलेचं थेट पाक लष्कराशी 'कनेक्शन' उघड

शेअर करा